१ मे पासून म्हणजेच उद्यापासून काही नियमांमध्ये मोेठे बदल होणार आहेत. त्यामुळे होणार बदल हा तुमच्या खिशाला कात्री लावणारा आहे. त्यात बॅंक, गॅस सिलेंडर ते कोरोना लस अशा सर्वच गोष्टीचा समावेश आहे.
अॅक्सिस बँक करणार मोठा बदल
अॅक्सिस बँकेने बचत खात्यात १ मेपासून किमान शिल्लक रक्कम ठेवण्याचे नियम बदलले आहेत. तसेच, एटीएममधून १ मेपासून मोफत मर्यादेनंतर पैसे काढल्यास सध्याच्या तुलनेत दुप्पट शुल्क वसूल केले जाणार आहे. शिवाय बँकेने यापूर्वीच इतर सेवांसाठी शुल्क वाढविले आहे. अॅक्सिस बँकेने १ मे २०२१ पासून किमान सरासरी शिल्लक मर्यादा वाढविली आहे. अॅक्सिस बँकेच्या सुलभ बचत योजना असलेल्या खात्यासाठी किमान शिल्लक रक्कम १०,००० रुपयांवरून १५,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
पॉलिसी कव्हर रक्कम दुप्पट वाढवली
कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान आरोग्य संजीवनी पॉलिसीची कव्हर रक्कम दुप्पट करण्याचे निर्देश विमा नियामक ‘आयआरडीए’ने दिले आहेत. गेल्या वर्षी १ एप्रिलपासून सुरू झालेल्या आरोग्य संजीवनी मानक पॉलिसीची कमाल कव्हरेज मर्यादा केवळ ५ लाख रुपयांपर्यंत होती.
गॅस सिलिंडरचे दर बदलणार
गॅस सिलिंडरचे दर हे निश्चित नसल्याने ते कायम बदलत असतात. गॅस सिलिंडरच्या नवीन किमतीही १ मे रोजी जाहीर केल्या जातील. गॅस सिलिंडरच्या किमती एकतर वाढवल्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत १ मेपासून सिलिंडरच्या किमती बदलू शकतात.
बँकांना १२ दिवस सुटी
मे महिन्यात बँका १२ दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुट्ट्यांच्या यादीमध्ये काही सुट्ट्या आहेत, जे फक्त स्थानिक राज्य पातळीवरच प्रभावी आहेत.
१८ वर्षांवरील लोकांचं लसीकरण
कोरोनाच्या कहरात १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. त्यात १८ वर्षांवरील सर्व लोकांना लस दिली जाईल. त्यामुळे अॅानलाईन रजिस्टेशन करने गरजेचे आहे.