संपूर्ण महाराष्ट्रात उद्या मराठमोळा सण गुढीपाडवा अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाईल. या वर्षी पाडव्यावर कोरोनाच सावट असलं तरी प्रत्येकजण आपापल्या घरी अगदी थाटामाटात हा सण साजरा करतील. याच सणाच्या निम्मिताने मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यांची आवडती व सुपरहिट जोडी अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट गुढीपाडवाचा सण साजरा करण्यासाठी सज्ज आहेत. उमेश कामतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रिया बापटसोबतचा एका फोटो पोस्ट केला आहे.
या फोटोमध्ये दोघांचाही मराठी पोशाखातील साज दिसत आहे. तसेच काय म्हणते आहे ही? Get ready for पाडवा की. असं कॅप्शन दिला आहे. प्रत्येक वेळी नवीन नवीन कल्पना घेऊन ते आपल्या चाहत्यांना खुश करत असतात. त्याचप्रमाणे या फोटोलादेखील चाहत्यांनी भरभरून लाईक्स व कमेंट दिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच त्या दोघानाही कोरोनाची लागण झाली होती, व ते आता ठणठणीत बरे होऊन गुडीपाढवा साजरा करण्यासाठी उत्साहित असल्याचे या फोटोमधून समोर येत आहे.