कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक जगभरात झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे जगभरातील परिस्थिती चिंताजनक होत असूनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून बेजबाबदारपणे वावरताना दिसत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून चिनी सरकार वेळोवेळी नागरिकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन करत आहे. चीन मध्ये चिनी कंपन्यांनी तयार केलेल्या लसीचा मुबलक प्रमाणात साठा असूनही चिनी नागरिक लस घेण्यास इच्छुक नसल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर चीन सरकारने एक नामी युक्ती लढवली आहे. जे नागरिक कोरोना लस घेतील त्यांना चीन सरकारकडून पंचतारांकित हॉटेल मध्ये जेवण, दारू गांजा व अन्य चैनीच्या वस्तू देण्यात येतील. त्याचप्रमाणे जे नागरिक लस घेणार नाही अश्यांना सरकारी व खाजगी कंपन्यांमधून कमी करण्यात येईल व तसेच त्यांच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात येईल. एवढेच नाही तर त्यांच्या घरावर जप्ती आणली जाईल.असे चीन सरकार कडून नागरिकांना सांगण्यात आले आहे.
चीन प्रमाणे अमेरिकेतही तेथील नागरिकांना अमेरिकेने कोरोना लस घेण्याचे आवाहन केले गेले परंतु प्रशासनाला नागरिकांकडून योग्य तास प्रतिसाद न मिळाल्याने अमेरिका सरकारने काही सवलती दिल्या आहेत.
अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस घेण्यासाठी एक दिवसीय सरकार मान्य रजा तसेच लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यासाठी टॅक्सी भाडे ही देण्यात येणार आहे.