ऑस्ट्रेलिया । ऑस्ट्रेलियावर सद्या निर्सगाचा कोप होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी वणवा पेटून न्यू साऊथ वेल्थ मधील जंगल व तेथील प्राणी जाळून खाक झाले.
या दुर्घटनेला वर्ष नाही होत तेच आता नवीन संकट समोर आले आहे. मुसळधार पावसामुळे ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्थ राज्य जलमय झाले आहे.
जवळपास शंभर सेंटीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. येथील रस्ते पुरामुळे पाण्याखाली गेले असल्याने अनेक ठिकाणचे संपर्क तुटले आहेत.
अतिवृष्टीमुळे स्थानिकांच्या घरात पाणी शिरले. वेळीच प्रसंगावधान राखत स्थानिकांनी स्थलांतर केले.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मेरिसन यांनी दिलेल्या माहितीनुसार सिडनी व जवळपासच्या शहरांची परिस्थिती चिंताजनक आहे.
सद्य स्थितीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी पुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सिडनीतील सर्वात मोठ्या धरणाची पाण्याची क्षमता पूर्ण झाली असून त्यातील उत्सर्ग आठवडाभर सुरू ठेवावा लागेल असेल ते म्हणाले.
दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात अजून पर्जन्यवृष्टी होणार असून पूरस्थिती कायम राहणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.