मुंबई । जर तुम्ही १० वी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर रेल्वेने तुम्हाला सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेने अनेक पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. रेल्वेतील १३० पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवार १५ मार्च २०२१ पर्यंत अर्ज दाखल करू शकतात. वेस्टर्न सेंट्रल रेल्वे तर्फे १३० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून उमेदवार किमान १० वी ५०% उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारास ITI मधील शिक्षण असणे आवश्यक आहे. भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार १५ ते २४ वयोगटातील असणे आवश्यक असून आरक्षित वर्गातील उमेदवारास वयाची सवलत देण्यात आली आहे.
अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवारांचं स्वाक्षरी
- १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र
अशी असेल निवड प्रक्रिया
ही निवड प्रक्रिया कोणत्याही लिखित परीक्षा किंवा मुलाखतीवर आधारित घेतली जाणार नाही.
१० वी उत्तीर्ण मार्क्स तसेच ITI उत्तीर्ण मार्क्स वरून निवड प्रक्रिया करून इच्छुक उमेदवार निवडण्यात येईल.