सोलापूर: – वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात मुंबई, पुणे आणि आता सोलापूर जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनत आहे. संक्रमित होऊन बधितांना श्वसनाचा त्रास होत असल्याने राज्यात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.याच पार्श्वभूमीवर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.अरविंद गिराम यांनी हॉस्पिटलमध्ये केलेल्या प्रयोगा दरम्यान सुरू केलेल्या नॉन रिब्रिथिंग मास्क रुग्णनांना वापरण्यात येत होता.या नॉन रिब्रिथिंग मास्कच्या वापरामुळे रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळत असून ऑक्सिजनची ५०% बचत होत असल्याची सकारात्मक घटना घडली आहे. हा प्रयोग राज्यातील अन्य हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या केल्यास ऑक्सिजनचा तुटवडा होण्याची समस्या राहणार नाही.
नॉन रिब्रिथिंग मास्कमुळे रुग्णांना ८०% जास्त ऑक्सिजन घेण्यासाठी मदत होते.नॉन रिब्रिथिंग मास्कमध्ये व्हॉल्व असणाऱ्या मास्कसोबत रिझरव्हायर बॅग जोडली आहे.या रिझरव्हायर ऑक्सिजनचा साठा मुबलक प्रमाणात होतो.व याबाबाबत रुग्णांना कोणतीही समस्या येत नाही.याउलट सामान्यतः ऑक्सिजन पाईपमुळे उच्छ्वास बाहेर सोडताना तो पुन्हा ऑक्सिजन मध्ये मिसळून रुग्णांच्या शरीरात जात असल्याने सामान्य ऑक्सिजन पाईपमुळे रुग्णांना पुरेसा श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो.व परिणामी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होतो.
पंढरपूरमध्ये उपजिल्हा रुग्णालयात डॉ. अरविंद गिराम यांच्या या अभ्यासपूर्ण नॉन रिब्रिथिंग मास्कचा वापर ४० रुग्णांवर उपचारादरम्यान केला असता,त्यांना श्वासनसंबंधी कोणताही अडथळा आला नसून श्वसनक्रिया स्थिर होत असल्याचे सांगितले जाते.या कृत्रिम ऑक्सिजनद्वारे रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढत असून मोठ्या प्रमाणात नॉन रिब्रिथिंग मास्कचा वापर राज्यातील सर्व रुग्णालयात केला तर ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात बचत होईल असे डॉ.नीरज दोडके यांनी सांगितले आहे.