सध्या देशात कोरोनाच संकट आहे. मात्र आयपीएलचा हंगामा सुरु आहे. एकीकडे आयपीएल सुरु आहे तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मधील २ खेळाडूंनी संघाला बाय बाय केले आहे. यावर्षीच्या आयपीएलच्या संघामध्ये आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची खेळी ही उत्कृष्ट ठरली आहे. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पहिल्या स्थानावर आहे. मात्र आता संघातील खेळाडूंनी माघार घेतल्याने मुंबई इंडियन्स संघातील एक गोलंदाज उधारीवर घेतला आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपला एक खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दिला आहे. मुंबईच्या टीममध्ये सध्या राखीव खेळाडू म्हणून असलेला स्कॉट कुगलाईन याला बंगळुरूने त्यांच्या टीममध्ये घेतलं आहे. लवकर स्कॉट कुगलाईन मुंबईच्या स्काॅडमधून बंगळुरूकडे येणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघात सामिल करून घेतलेल्या केन रिचर्डसन आणि एडम झम्पा यांनी भारतात कोरोनाचे रुग्ण व परिस्थिती पाहून भीतीमुळे ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता, यानंतर आता बंगळुरूच्या कोचने स्कॉट कुगलाईनची संघात निवड केली आहे.