कोरोना विषाणूचा जगात शिरकाव झाल्यापासून सर्वच कार्यक्रमांवर व सणांवरती कोरोनाच सावट आलं आहे, त्यामुळे सर्व सण उत्सव घरीच साजरे करावे लागत आहेत. त्यामुळे राज्यात गुढीपाडवा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केले आहे.
हा सण तसेच आगामी नवे वर्ष सर्वांकरीता सुख, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो अशा सर्वांना शुभेच्छा देतो. युगादी, चेती चाँद, बैसाखी तसेच सौसर पाडवो निमित्ताने देखील मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. तसेच सण सर्वानी घरीच साजरा करण्याचे आवाहन दिले आहे.