आज ८ मार्च महिला दिनानिमित्त जगातील सर्व महिला सोशल मीडियाद्वारे एकमेकींना शुभेच्छा देत आहे. यातच अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने सर्व महिलांना शुभेच्छा देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्रार्थनाने आणखी फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोत तिने मासेविक्री करणाऱ्या महिलेप्रमाणे लूक केला असून ती मासे विकताना दिसत आहे. तिने विविध लूकद्वारे विविध काम करणाऱ्या महिलांना सलाम केला आहे. प्रार्थना हि उत्कृष्ठ मराठी अभिनेत्री असून तिने अनेक सिनेमे, मालिका यांमध्ये काम केले आहे , व आता प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे.
फोटोत तिने डोक्यावर ओझे वाहणाऱ्या महिलेसारखा लूक केला असून या लूकमधील तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
या पोस्टसोबत तिने लिहिले आहे की, जागतिक महिलादिनी आम्हाला त्या कणखर आणि खंबीर महिलांना सलाम करावासा वाटतो ज्या आपल्या कष्टाने रोज घाम गाळून छोट्या प्रमाणावर का होईना देशाच्या आर्थिक उन्नतीतमध्ये भर घालतात आणि नेटाने आपले घर आणि देश चालवतात अशा सर्व कष्टकरी रणरागिनी महिलांना माझा सलाम…
अशा प्रकारे तिने महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिला दिन साजरा केला आहे.