खरंतर सध्या कोरोनाचा विषाणू सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. मात्र एवढा कठीण परिस्थितीतही डॉक्टर, नर्स, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचारी आपले कर्तव्य चोख पार पाडत आहेत. कोरोनाच्या काळात आपल्या घरापासून लांब राहून काहीजण रुग्णांची सेवा करतायत तर काहीजण आपल्या चिमुकल्यांना सोडून आपलं काम करत आहेत. अशातच एक मानवतेच्या दृष्टीकोनातून नर्स करत असलेल्या कामाचं वृत्त सूरतमधून समोर आलं आहे. ४ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या नर्स रुग्णांच्या सेवेत सातत्यानं झटत असल्याचं समोर आलं आहे. सध्या रमझानचा महिना सुरू असून त्या रोजादेखील ठेवत आपलं कर्तव्य पार पाडत आहेत.
Gujarat: Nancy Ayeza Mistry, a four months pregnant nurse has been attending patients at a COVID care center in Surat, while observing 'Roza'.
She says, "I am doing my duty as a nurse. I consider serving people as prayer." pic.twitter.com/Hx1EQXEAOx
— ANI (@ANI) April 24, 2021
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार नर्सचे नाव नॅन्सी आयझा मिस्त्री असं आहे आणि त्या चार महिन्यांच्या गर्भवती आहेत. सूरत येतील कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी झटत आहेत.सध्या रमझानचा महिना सुरू आहे. या महिन्यात त्या आपला रोजा ठेवून रुग्णांचीही काळजी घेतला आहे. “मी नर्सप्रमाणे आपलं कर्तव्यच बजावत आहे. माझ्यासाठी रुग्णांची सेवा हिच इबादत आहे,” असंही त्या म्हणाल्या.