प्रभु रामचंद्राचा सेवक. दास्यभक्तीकरता सदैव तत्पर, रामायणातील सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व म्हणजे रामभक्त हनुमान होय. प्रभु रामचंद्राच्या आदेशाला आज्ञा प्रमाण मानत समुद्र उल्लंघुन लंकेकडे कुच करणारा हनुमान दास्यभक्तीचे एक अत्युत्तम उदाहरण होय. रावणाने शेपटीला आग लावल्यानंतर संपुर्ण लंकेला क्षणार्धात आपल्या शेपटीने आगीच्या भक्ष्यस्थानी नेणारा हनुमानच होता.
समुद्र पार करण्यात हनुमानाने प्रभु रामचंद्रांची मदत केल्याचे देखील पुराणात सांगीतले आहे. हनुमानाचा उल्लेख महाभारतात देखील आढळतो. कुरूक्षेत्रावर युध्दादरम्यान तो अर्जृनाच्या ध्वजावर बसलेला आहे.
रामभक्त हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला असल्याने त्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. (संपुर्ण भारतात हनुमानाच्या जन्मतिथी बद्दल अनेक मत मतांतरे आहेत) हनुमानाचा जन्म पहाटे सुर्य उगवतांना झाला असल्याने उगवत्या सकाळी हनुमानाचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येतो. मारूतीचा जन्म अगदी सुर्योदयाच्या वेळेचा असल्याने त्याच्या जन्माचे किर्तन सुर्योदयापुर्वीच सुरू होते.
मारुतीचा रंग शेंदरी असण्याविषयी एक गोष्ट आहे. एकदा सीतेने स्नानानंतर कपाळाला शेंदूर लावला. तेव्हा हनुमानाने त्याचे कारण विचारले. सीता म्हणाली, रामाचे आयुष्य वाढावे; म्हणून मी शेंदूर लावते. मारुतिराया रामाचा निस्सीम भक्त होता. तो म्हणाला, माझ्या स्वामींचे आयुष्य याने वाढणार असेल, तर मी सर्व अंगालाच शेंदूर लावतो. असे म्हणून त्याने स्वतःच्या पूर्ण अंगाला शेंदूर लावला.
हे प्रभु श्रीरामाला समजल्यावर तो प्रसन्न झाला आणि म्हणाला, मारुतिराया, तुझ्यासारखा माझा अन्य कुणीच भक्त नाही. तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी आहे. हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असतांना भरताने त्याला बाण मारला. तेव्हा त्याच्या पायाला दुखापत झाली आणि ती शेंदूर आणि तेल लावल्यामुळे बरी झाली, त्यामुळे हनुमानाला शेंदूर वाहतात आणि तेल लावतात.
हनुमान हा चिरंजीव असल्याने तो आज देखील अस्तित्वात असल्याची मान्यता आहे. जेथे जेथे प्रभु रामचंद्राचे नाव घेतल्या जाते त्या ठिकाणी सर्वात आधी येणारा हनुमंत असतो असे मानले जाते.
हेही वाचा.
- दिलासादायक! भारतात कोरोनारुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
- उसाच्या रसाची ब्रँडेड मार्केटिंग! ‘गावरान मुंडे’नंतर आता पांडबाच्या उसाच्या रसाची सोशल मीडियावर चर्चा
- विविधतेने नटलेला कोकणातला आगरकोट किल्ला,या किल्ल्याचा इतिहास वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
- नवसंजीवनी द्याया,धावूनी या हनुमंतराया!!
- गोष्ट पहिला महिला डॉक्टरची; जिने अनेक शोध लावले, तिला नोबेल पुरस्कार मिळाला पण..