संभाजीनगर : संभाजीनगर शहरात लॉकडाउनच निर्णय रद्द होताच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात एकच गोंधळ घालून खासदार इम्तियाज जलील यांची जंगी मिरवणूक काढली होती. यावेळी स्वागतासाठी मोठया प्रमाणात गर्दी उसळली होती. यावरून आता शहरात वातावरण चांगलचं तापू लागलं आहे. त्यात त्यांच्यावर सर्व बाजूंनी टीका होताना दिसत आहे.
याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्मान सेना नेते अमेय खोपकर यांनी खासदार जलील यांच्यावर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “MIM च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमघ्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे” असं मनसे नेते अमेय खोपकरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे ‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे” अशी मागणीही अमेय खोपकर यांनी केली आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 31, 2021