ऑनलाईन खरेदी पासून ते सर्व बिल भरण्यापर्यंत क्रेडिट कार्डसचा सर्रास वापर केला जातो. याचाच गैरफायदा घेऊन अनेक सायबर गुन्हेगार बँक ग्राहकांची लूट करतात.
अशातच आता एसबीआय बँकेतील ग्राहकांची आर्थिक लूट झाल्याची माहिती समोर आली आहे.
स्टेट बँकेच्या ग्राहकांना क्रेडिट पॉईंट्स म्हणजेच एसबीआय क्रेडिट कार्ड रोखीत बदलून घ्या आणि ९ हजार ७८० रुपये मिळवा असे फसवणूक करणारे मेसेजेस पाठवले जात असून ते खोटे असल्याचे सिद्द झाले आहे.
ग्राहकांची माहिती गोळा करून त्यांना हॅकर्स आर्थिक गंडा घालत असल्याची माहिती नवी दिल्लीतील सायबरपीस फाऊंडेशन आणि ऑटोबोट इन्फोसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांनी समोर आणली आहे.
तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचं क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर आताच तुमचं खातं आणि क्रेडिट कार्ड पॉईंट्स चेक करून घ्या.
कारण हॅकर्सने फक्त फसवणूक चे मेसेजेसच नाही तर स्टेट बँकेची बोगस वेबसाईट तयार केली असून त्यावर बँक ग्राहकांनी आपली माहिती भरण्यास सांगितले जात आहे.
स्टेट बँक आपल्या ग्राहकांना वैयक्तिक माहिती कोणत्याही वेबसाईटवर भरण्यास सांगत नाही, ही वेबसाई हॅकरची असल्याचे सिद्ध होते.
त्यामुळे तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचं क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर आताच तुमचं खातं आणि क्रेडिट कार्ड पॉईंट्स तपासून घ्या. दरम्यान या वेबसाईटचे या वेबसाइटचे डोमेन भारतातीलच असून, ते तमिळनाडूमधील असल्याचे ‘सायबरपीस’चे म्हणणे आहे.
लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन व्यवहाराला लोकांनी पसंती दर्शविल्यापासून ऑनलाइन फ्रॉड च्या केस मध्ये वाढ होत असल्याने सुरक्षितरित्या व्यवहार करावा व आपल्या बँक खात्याबद्दलची चौकशी संबधीत जाऊन करावी.