पुणतांबा :पुणतांबा शेतकरी सेनेचे हेमंत कुलकर्णी, यांना दिवाळीचे दुसरे दिवशी पुणतांबा श्रीरामपुर रोडवर हाॅटेल निसर्ग चे पुढे मोटारसायकल वरून श्रीरामपुर कडे जात असताना रोडवर रस्ता क्रॉस करत असलेले कासव रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ असल्याने ते भेदरलेल्या अवस्थेत सापडले होते.
त्याची माहिती कार्य तत्पर कर्तव्य दक्ष वनविभाग आधिकारी सौ सोनवणे यांना फोन वरुन दिली होती परंतू दिवाळीची दोन दिवस सुट्टी असल्याने ते कासव कुलकर्णी यांनी स्वतःकडे सुखरूप ठेवले.आज वनविभागाच्या आधिकारी सौ प्रतिभाताई सोनवणे यांनी पुणतांबा येथे स्वत: उपस्थितीत राहून कासव सुखरूप पणे ताब्यात घेतले.
शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे निवासस्थानी सौ सोनवणे यांचा पुणतांबा शहरशिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी सौ सोनवणे ताई या पुणतांबा परीसरात कार्यतत्पर कर्तव्यदक्ष राहून सहकार्य करत असतात. या आधी असेच एक हरीण नर जातीचे वनविभागाकडे सुखरूप सोपवण्यात आले होते.
पुणतांबा ,एकखुरके , कान्हेगाव वारी ,येथे अपघाती मरण पावलेले हरीण ,विहिरीत पडलेले हरीण याबाबद त्यांना फोन केला असता त्यांनी तात्काळ मदत करून दिलासा दिला होता. त्यांचे काम कार्य उल्लेखनीय व कौतुकास्पद ,कार्य तत्पर ,कर्तव्य दक्ष आहे असे सांगितले, त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी वनविभाग आधिकारी सौ प्रतिभाताई सोनवणे, वनविभाग कर्मचारी, तसेच पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी, शेतकरी सेनेचे हेमंत कुलकर्णी, शिवसेना शाखाप्रमुख राहुल इंगळे, पोलीस मित्र निलेश गायकवाड, आदीजन उपस्थित होते.