स्त्री ने चूल आणि मुलंच सांभाळणं हीच तिची ओळख सुमारे1960 ते 1990 पर्यंत च्या समाजात हा विचार अत्यंत प्रभावी होता. आणि याच विचारांना छेद देत नीरजा भनोटने स्वतः च्या अस्तित्वाची दखल जगाला घेण्यास भाग पाडलं. सप्टेंबर1963 मध्ये चंदीगड मधील जन्मलेली नीरजा एका सामान्य कुटुंबातील असामान्य मुलगी होती. तिचे वडील मुंबई टाइम्स ला पत्रकार म्हणून कार्यरत होते.
चंदीगड मध्ये शालेय शिक्षण पूर्ण झल्यावर तिने आपले पुढील शिक्षण मुंबईतील जेवीयर्स महाविद्यालयात पूर्ण केले. 1985 मध्ये अवघ्या 22 वर्षी निराजाचे लग्न होऊन ती आपल्या पती सोबत परदेशी गेली. परंतु हतावरची मेहंदी निघत नाही तितक्यात तिच्या सासर कडून तिच्यावर हुंड्यासाठी सतत दबाब टाकला जायचा. नवऱ्यावर विश्वास ठेवून आपलं घर सोडून ती सासरी आली त्याच नवऱ्याने तिचा हुंड्यासाठी मानसिक छळ केला.
कोवळ्या वयात इतका मानसिक सहन न झाल्याने अवघ्या दोन महिन्यातच नीरजा मुंबईला परतली. जे झालं ते विसरून आयुष्य नव्याने जगण्याचा निर्णय तिने घेतला व यात निर्णयात तिला तिच्या घरच्यांचे प्रोत्साहन मिळाले. भूतकाळ मागे सारून नीरजाने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तिने विमान परिचारिका या पदासाठी अर्ज दाखल केला आणि काही दिवसांनी तिची मियामीला पुढील प्रशिक्षणासाठी निवड झाली.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विमान परिचारिका म्हणून रुजू झालेल्या निराजाने आयुष्यात कधी मागे वळून पहिलंच नाही जे काही घडलं ते वाईट स्वप्नं असल्यासारखं तिने आपला भूतकाळ मागे सारला आणि आयुष्यात येणाऱ्या नवीन क्षणांचे आनंदाने स्वागत करायचे ठरवले. 5 सप्टेंबर 1986 रोजी पॅन अमेरीकन वर्ल्ड एअरवेजचे चे बोईंग 474- 121 हे मुंबईहून न्यूयॉर्ककडे जाणाऱ्या विमानाचे कराची मध्ये 4 दहशतवाद्यांनी अपहरण केले.
400 प्रवासी असलेल्या या विमानात नीरजा विमान परिचारिका म्हणून काम करत होती. सकाळी सुम 5 वाजताच्या दरम्यान निराजाने कॉकपीट मधील विमान चालकाला विमान अपहरणाची माहिती व विमान धावपट्टीवर असतानाच विमान चालक आणि इंजिनिअर विमानातून पळून जाऊ शकले. पायलट च्या अनुपस्थितीत विमानातील प्रवाश्यांची जवाबदारी व सगळी सूत्रे नीरजाने आपल्या हाती घेतली. अपहरणकरणारे दहशतवादी पॅलेस्टाईन येथील अबू निदाल या गटाचे सदस्य होते व त्यांना लिबियाचा पाठिंबा होता.
प्रवाशांपैकी एका अमेरिकन असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या केली. त नीरजाला नंतर सर्व प्रवाशांचे पासपोर्ट गोळा करण्यास सांगितले. प्रवाशांमधील इतर अमेरिकन नागरिकांना मारण्याचा दाहशवाद्यांचा उद्देश होता. मात्र, नीरजा व तिच्या सहकाऱ्यांनी विमानातील इतर १९ अमेरिकन नागरिकांचे (१८ प्रवासी व १ विमान कर्मचारी) पासपोर्ट लपवून ठेवले. काही पासपोर्ट त्यांनी खुर्चीखाली लपवले तर काही कचऱ्यासाठीच्या पेटीत टाकून दिले.
या जीवघेण्या 17 तासांनी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला दरम्यान प्रसंगावधान राखत प्रवाश्यांचा आणि सहकाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी निराजाने आपत्कालीन दरवाजा उघडला व प्रवाश्यांची सुटका केली. याच वेळी दहशतवाद्यांच्या गोळीबारातून तीन लहान मुलांना वाचवताना निराजाने जीवावर उदार होऊन तिच्या होणार गोळीबार सहन केला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. अवघ्या 22 वर्षीय नीरजा भनोट ने देशासाठी आणि प्रवाश्यांसाठी आपल्या प्राणाची बाजी लावली.
तिच्या या शौर्याचे जगभरात कौतुक झाले. अमेरिका देशाने तिला द हिरॉईन ऑफ हायजॅक असे म्हणत तिच्या धाडसाचे कौतुक केले. 22 व्या वर्षी तिने दाखवलेल्या शौर्यसाठी भारत सरकारने तिला मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. एवढया कमी वयात अशोक चक्राने सन्मानित केलेली ती पहिलीच स्त्री होती. निराजच्या आयुष्यावर आधारित नीरजा हा चित्रपट प्रदर्शित झाला. जे हात ककणांनी भरलेले असतात तेच हात वेळ पडलीच शस्त्र ही हाती घेतात. जिच्या अंगी सहनशीलता असते तीच वेळप्रसंगी वाघीण होऊन शौर्याच थैमान घालते. हे नीरजा भनोटने दाखवून दिलं. नीरजा भनोट च्या या शौर्याला शिवबंधन न्यूज चा मनाचा सलाम.