बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका नेहा कक्कर ही सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. तसेच ती कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. प्रत्येक कार्यक्रमाची तयारी नेहा कक्कर व तिची फॅमिली धुमधडाक्यात करत असते. शुक्रवारी सोशल मीडियावर नेहा कक्कर हिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती होळीच्या पार्टीत दंग झाली आहे. पती रोहनप्रीत सिंग आणि भाऊ टोनी कक्कर यांच्यासोबत नेहाचा संपूर्ण परिवार होळी पार्टी एंजॉय करत आहेत.
टोनीचा कक्करच ‘सूट तेरा टाइट’ या गाण्यावर नेहा आणि तिचे कुटुंबीयांनी ताल धरला आहे. रोहनप्रीतने नेहाला उचलून घेतलं असून पूलमध्ये हे दोघं डान्स करत आहेत. पूलमध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण धमाल करताना दिसत आहेत. संपूर्ण कुटुंबीयांसाठी नेहाने या पार्टीचं आयोजन केलं आहे. कुटुंबीयांसोबत प्री-होली फन’, असं कॅप्शन नेहाने या व्हिडीओला दिलं आहे.