मुंबई दि. १० – अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांना भरलेल्या वाहनाच्या मालकाचा म्हणजेच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन राज्यात खळबळ उडाली आहे. व याचं वरून राज्यात वातावरण चांगलचं ढवळलं आहे. विधानसभेत मंगळवारी विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले व हे वातावरण तापंल आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. सचिन वाझे यांच्या मुद्यावरुन विधिमंडळात भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर, सत्ताधारी महाविकासआघाडी याप्रकरणी काय भूमिका घेणार हे याकडे सगळ्याचे लक्ष आहे. सचिन वाझेंना क्राईम ब्राँचमधून दुसऱ्या ठिकाणावर पाठणार, असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषित केले.