कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे औषधे, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा तुटवडा दिवसेंदिवस वाढतच जात आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांसाठी संघर्ष करावा लागतोय. याच गोष्टीचा गैरफायदा घेणाऱ्या काही निर्दयी लोकांनी असंवेदनशीलतेची परिसीमा पार केली आहे.
व्हाईस वर्ल्ड न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार एका तरुणीच्या कुटुंबातील सदस्य कोरोनाबधित झाल्यामुळे रुगणालायत तातडीने दाखल करण्यात आले,परंतु व्हेंटिलेटरची सोय नसल्याने या कुटुंबाने व्हेंटिलेटरसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचे ठरविले. सुदैवाने काही तासातच व्हेंटिलेटरची सोय झाली. पण काही दिसवसांनी ए पॉझिटिव्ह प्लाझ्माची गरज निर्माण झाली. त्यावेळी कोणीही प्लाझ्मा डोनर उपलब्ध होत नव्हते. म्हणून मदतीसाठी माझ्या काही मित्र-मैत्रिणींनी माझा फोन नंबर सगळीकडे शेयर केला. त्यावेळेस माझी खाजगी माहिती पब्लिक होईल याचा मला अंदाज होता, पण कुटूंबातील सदस्याला वाचवणं त्यावेळी गरजेचं होतं म्हणून मी हिम्मत करून माझा मोबाईल नंबर शेयर करू दिला.
पण हा निर्णय माझ्या मानसिक त्रासाचे कारण ठरेल असे स्वप्नत सुद्धा वाटले नव्हते.प्लाझ्मा डोनर तर मिळत नव्हते. त्यावेळी एका व्यक्तीचा फोन आला आणि मी सिंगल आहे का? ,कुठे राहते काय करते असे प्रश्न विचारत होता.एकाने माझा डीपी खूप छान आहे हे सांगण्यासाठी फोन केला. मी माझ्या कुटुंबातील आजारी व्यक्तीच्या चिंतेत असल्याने या कॉल कडे दुर्लक्ष केलं आणि नंबर ब्लॉक केले.
हा सगळा प्रकार इथेच थांबला नाही तर काहींनी मला व्हाट्सएपवर व्हिडीओ कॉल करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी मला अश्लिल फोटो पाठवले. कोरोनाच्या कठीण काळात या मानसिक विकृतीचा मी बळी ठरेल असं वातलंही नव्हतं. पुढे जाऊन अजून त्रास होऊ नये यासाठी मी सगळ्या सोशल मीडियावरून माझा नंबर काढून टाकला. या कठीण प्रसंगातही लोकं विकृतीचा कळस गाठतील हे मी विसरले होते.हा धक्कादायक प्रकार या तरुणीने सांगितला आहे.