‘
बुलढाणा : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर संपूर्ण भारतीय जनता पक्ष आमदार गायकवाड यांच्यावर तुटून पडला होता. तसेच आमदार संजय कुटे यांनी गायकवाड यांचा पुतळा जाळला होता. त्यात देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा याच मुद्द्यावर बोलताना गायकवाड यांना मद्यपान करणाऱ्यांची उपमा दिली होती.
आता फडणवीसांनी केलेल्या टीकेला आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ‘मला सल्ला द्यायची गरज नाही, त्यांनी केंद्राला सल्ला द्यावा आणि फडणवीस यांनाच तळीराम पाळायची सवय असून लेडीज बारमध्ये त्यांच्या जवळचे माजी मंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जातात असा टोला गायकवाड यांनी लगावला होता.
आमदार संजय गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांची चांगलीच शाळा घेतली होती . भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करून पहिला प्रयोग तुझ्या मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू’ अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर उत्तर देत संजय गायकवाड यांनी नितेश राणेंची यांची तुलना थेट बेंडकाशी केली.