कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात प्रशासनाने कडकडीत लॉकडाऊन जाहीर केलाआहे.अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सर्वसामान्यांना वाहतूक व्यवस्था करण्यात आली असल्याने रस्त्यावर वाहनांची तुरळक गर्दी पाहायला मिळते.
नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करून सुद्धा अनेक जण प्रशासनास सहकार्य करत नसल्याने यावर तोडगा म्हणून कलर कोड स्टिकर जाहीर करण्यात आले.लाल,पिवळा आणि हिरवा हे कलर असणाऱ्या कलर कोड स्टिकर असलेल्या वाहनांशिवाय अन्य वाहने रस्स्यावर दिसल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल असे सांगितले जाते आहे.
अशातच आता एका युजर्सने मला गर्लफ्रेंड भेटायचं आहे.खूप दिवस झाले मला तिची आठवण येतेय.मी कोणता कलरकोड स्टिकर वापरू? असा प्रश्न ट्वीट करत मुंबई पोलिसांना टॅग केला आहे.
@MumbaiPolice what sticker should I use in order to go out and meet my girlfriend? I miss her????
— Ashwin Vinod (@AshwinVinod278) April 22, 2021
आक्रमक शैलीच्या मुंबई पोलिसांनी या युसर्सला प्रेमळ शब्दात समजवले आहे.गर्लफ्रेंडला भेटणं जरी तुमच्यासाठी कितीही गरजेचं असलं तरीही प्रशासनाच्या अत्यावश्यक सेवेमध्ये लागू होत नाही. दुरावा नात्यातली ओढ कायम ठेवतं. तुम्ही आयुष्यभर एकत्र राहा यासाठी शुभेच्छा. मात्र आताचा काळ बाहेर जाण्यास योग्य नाही त्यामुळे घरीच राहा आणि काळजी घ्या. असे मुंबई पोलिसांनी यूजरला प्रतिक्रिया दिली आहे.