मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या आणि स्थानिक प्रश्नाच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. त्यात आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना सावधानतेचा सल्ला दिला आहे.
अनेक मोठमोठ्या सोसायटीत कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे. अनेक जण कोरोना चाचणीसाठी तयार होत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होत आहे. यामुळे मनपाने कठोर निर्णय घेतले आहेत. जर एखाद्या बिल्डींगमध्ये पाच पेक्षा जास्त रुग्ण आढळले तर ती संपूर्ण सोसायटी सील केली जाणार आहे. तसेच अनेक हायप्रोफाईल सोसायटीत रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
तसेच मुंबईतील ऑफिसच्या वेळा बदला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत. मात्र तरीही वारंवार अनेक जण बाहेर पडत आहे. वर्क फॉर्म होमच्या सूचना दिल्या आहेत. जास्ती जास्त लोकांनी वर्क फॉर्म होम करण्यावर भर द्यावा. मुंबईतील गार्डनमध्ये मार्शल फिरत आहेत. पब आणि समुद्र किनारे, बार, हाॅटेल या ठिकाणी लोकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.