पश्चिम बंगाल : तृणमुल काँगेस आणि भारतीय जनता पक्षांमध्ये मुख्य लढत झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकाल लागण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या आठव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर केलेल्या एक्झिट पोल्सनुसार भाजपा बऱ्याच जागांवर विजय मिळवेल असा दावा एक्झिट पोलमधून करण्यात आलेला आहे.
त्यात ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लगार प्रशांत किशोर यांची वर्तवलेले भाकीत खोटे ठरताना दिसत आहे. बहुतेक एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजप १०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी निवडणुकीआधी असा दावा केला होता, की जर भाजपला तीन अंकी जागांवर विजय मिळाला तर मी राजकीय सल्लागाराचं काम सोडेल. अशातच आता समोर येत असलेल्या एक्झिट पोलनुसार त्यांचा हा दावा खोटा ठरत असल्याचे चित्र आहे.
किशोर यांनी असा दावा केला होता, की बंगाल निवडणुकीत भाजप तीन अंकी डिजीट पार करू शकणार नाही. असं झाल्यास ते आपलं काम सोडून देतील. त्यांनी असंही म्हटलं होतं, की भाजप केवळ वातावरण निर्मिती करतं, प्रत्यक्षात मात्र काहीच करत नाही. मात्र एग्जिट पोलनुसारच भाजपला 100 हून अधिक जागांवर विजय मिळताना दिसत आहे. त्यामुळे आता प्रशांत किशोर यांचे भाकीत खरे ठरणार की खोटे हे येणाऱ्या २ मे दिवशी समोर येणार आहे.