उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूरमध्ये प्रचारासाठी गेले असता त्यांनी विरोधीपक्षावर धारधार शब्दात टीका केली होती. व चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो असा टोला त्यांनी लगावला होता. यावरुन चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना संताप व्यक्त केला आहे.
खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचेसुद्धा जे शॉर्ट फॉर्म आहेत…त्यांच्या मुलापासून सर्वांचे शॉर्ट फॉर्म मला करावे लागतील,” अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे.
तसेच चंद्रकांत पाटलांनी बोलताना निवडणूक त्यांच्या हातून गेल्याचं हे लक्षण आहे. ज्याप्रकारे ते बोलत आहेत त्यावरुन पायाखालची जमीन सरकली आहे असं दिसत आहे. पायाखालची जमीन सरकली ही जिभेवरचा ताबा सुटतो. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजपा जिंकणार हे स्पष्ट आहे,” असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.