देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ११ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मात्र याच संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. लस महोत्सव साजरा करण्यासाठी ‘आम्ही महोत्सव करू, आधी लस तर द्या’ असे पाटील म्हणाले.
कोरोना विषाणू आल्यापासून तुम्ही लोकांना थाळ्या वाजवायला लावल्यात, थाळ्याही वाजवल्या आता ‘लस महोत्सव’ साजरा करायला सांगताय पण महोत्सव साजरा करायला लसीचा साठा तर असला पाहिजे. राज्यात अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा निर्माण होत आहे, अनेक ठिकाणची लसीकरण केंद्रही बंद करण्यात आली आहेत. यावरून सत्ताधारी व विरोधी पक्ष एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी देशात चार दिवस लसीकरण महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
लस महोत्सव साजरा करण्यासाठी लस उपलब्ध होण्याची गरज आहे. आम्ही महोत्सव करू. पण आधी तर लस द्या. लस पुरवठा करणे शक्य नसेल, तर लस महोत्सवाची वेळ बदला. तसेच लस वाटप नियंत्रण केंद्राच्या हातात आहे. मात्र, केंद्र सरकार नियोजन करण्यात अपयशी दिसत आहे, असेही ते म्हणाले.