भारतात करोनाचा प्रसार झपाट्याने वाढत चालला आहे, तर दुसरीकडे करोना संपल्यासारखे लोक नियम तोडून मोकाट गर्दी करत आहेत. नियमाचे उल्लंघन करत आहेत. परंतु या सर्वांचा गंभीर परिणाम होईल असा इशारा राज्याचे करोना संबंधीचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी इंडिया टुडेशी बोलताना दिला आहे.
“जर सरकारने योग्य काळजी घेतली नाही आणि लोकांनी सरकारने आखून दिलेल्या नियमांचं पालन केलं नाही तर करोना इतर राज्यांमध्ये फैलावेल तो दिवस दूर नाही,” अशा शब्दांत डॉक्टर साळुंखे यांनी गंभीरता सांगितली आहे.
दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल महाराष्ट्राकडून मिळणाऱ्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं सांगितलं. “करोना व्हायरस फक्त महाराष्ट्रातच राहणार असा विचार करु नका, करोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पावलं उचचली गेली नाही तर एप्रिल महिन्यात उत्तर आणि ईशान्य भारतात महाराष्ट्रासारखी परिस्थिती असेल,” असंही ते म्हणाले आहेत.