अनेकवेळा वजन वाढणे हा सध्या प्रत्येकाचा प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे वजन कमी कसे करायचं यासाठी कित्येक जण डॅाक्टरांचा सल्ला घेत असतात किंवा जिम,योगा यासारख्ये प्रकार करत असतात. मात्र अमेरिकेतील एका पठ्यान आगळावेगळा उपाय करून आपलं वजन कमी केलं आहे.
वजन कमी करायचं म्हटलं कि फक्त पोषक आहार घेणे हा उपाय असतो व मद्यपान टाळणे, खाण्यातील साखरेची प्रमाण कमी करणे यासारख्या गोष्टी टाळण्याचे डॉक्टर सलले देतात मात्र अमेरिकेतील डेल हॉल नावाच्या व्यक्तीने चक्क बियर पिऊन २ महिन्यात १८ किलो वजन कमी केलं आहे. दोन महिने त्याने काहीही खाल्ले नाही तसेच तो भूक लागल्यास दिवसातून ५ वेळा भूक लागल्यास बियर पित असे.
खरंतर विश्वास बसणं कठीण आहे पण हे खरं आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार हॉल याचे म्हणणे आहे कि त्याला ब्लड प्रेशर,कोलेस्ट्रॉल,शुगर यांसारखे आजार होते मात्र आता त्याचे शुगर नियंत्रणात आले आहे. व त्यामुळे तो खूप खुश आहे व आता तो काहीही खाऊ शकतो याचा त्याला आनंद आहे.