कोल्ड्रिंक हे बाराही महिने उपलब्ध असल्याने सर्वसामान्यांमध्ये आवडीचे आहे. विशेषतः उन्हाळा आल्यावर अनेक जण कोल्ड्रिंकला जास्त प्राधान्य देतात.
परंतु कोल्ड्रिंकचे अतिसेवन केल्यास यातील असलेल्या फॉस्फरिक ऍसिडमुळे हाडे व दातांची झीज होते. तसेच यातील साखरेच्या अतिप्रमाणामुळे लठ्ठपणा येतो.
त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी पारंपरिक शितपेयांना प्राधान्य दिल्यास शरीरासाठी फायदेशीर आहे.
१) मठ्ठा
ताकापासून बनवण्यात येणारा मठ्ठा हा शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतो.
लग्न समारंभात जेवणानंतर मठ्ठा पिण्याची सोय केली जाते, त्याचे कारण असे दुपारच्या जेवणानंतर मठ्ठा प्यायल्याने अपचनाचा त्रास होत नाही.
मठ्ठा मध्ये असलेल्या जिरेपूड, कोथिंबीर मुळे जेवण पचते आणि शरीरात थंडावा राहण्यास मदत होते.
२)कोकम सरबत
उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेने डोकेदुखी व ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. कोकम सबरतामुळे ऍसिडिटीचा त्रास कमी होतो. प्रामुख्याने कोकण विभागात कोकमाची बागायती शेती करत असल्याने येथील लोकांचे शहाळा प्रमाणे कोकम सरबत हे मुख्य पेय मानले जाते. कोकमपासून सोलकढी बनवण्यात येते. सोलकढी प्यायल्याने पचन शक्ती वाढण्यास मदत होते.
३) भाताची पेज
कोकणी माणसाची सलाईन म्हणून भाताच्या पेजेला ओळखले जाते. भाताची पेज प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमी भरून निघण्यास मदत होते. ताप आल्यास भाताची पेज प्यायल्याने ताप लवकर उतरतो. तसेच भाताच्या पेजेमध्ये कोकम तेल टाकल्याने अतिसाराची समस्या दूर होते.
४) कैरीचे पन्ह
चवीला आंबट गोड असणाऱ्या कैरीच्या पन्हाच्या सेवनाने शरीराला आराम मिळतो. मूळव्याध व बद्धकोष्ठतेवर कैरीचे पन्हं हा रामबाण उपाय आहे.
तसेच हिरड्यांचे आरोग्य उत्तम होते. कैरी मध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडेंट मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यात मदत होते.
५) शहाळ्याचे पाणी
रोज सकाळी शहाळ्याचे पाणी पिल्याने शरीरातील टॉक्सिस बाहेर पडण्यास मदत होते. शहळ्याचे पाणी रोज पिल्याने त्वचेचा पोत नैसर्गिकरित्या उजळतो. शरीरात उष्णता निर्माण झाल्याने लघवी साफ न होण्याची समस्या उदभवल्यास शहळ्याच्या पाण्याने लघवीची समस्या दूर होते. तसेच त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी पारंपरिक शितपेयांचा वापर केल्याने शारीराला फायदा होतो.