कोल्हापूर दि. १९- लॉकडॉउन काळातील सर्वसामान्य ग्राहकांचे वीजबिल माफ करावे यामागणीसाठी कोल्हापुर जवळील पंचगंगा पूलावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आल. यावेळी आंदोलकांनी पुणे- बेंगलोर महामार्ग रोखला होता. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या रास्तारोको दरम्यान दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. यावेळी NH4 वर वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र दिसत होते. वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडू नका, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली.
राजू शेट्टी आणि वीज अभ्यासक प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. सरकारने दिलेलं आश्वासन पाळाव असं आंदोलकांचं म्हणंन होतं. भाजप वगळता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा या आंदोलनात सहभाग होता. सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा द्या आणि वीज बिल माफ करेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.जबरदस्ती वीज बिल वसूल कराल तर आम्ही कायदा हातात घेवू, असं खुलं आवाहनही राजू शेट्टी यांनी यावेळी राज्य सरकारला दिले.