देशात कोरोनाची भयावह स्थिती निर्माण झाली असून दिवसेंदिवस मृतांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. दिवसभरात दोन लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. अशातच इगतपुरी त्रंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांना देखील दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.
आमदार हिरामण खोसकर यांनी कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. याआधीही त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी व स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन खोसकर यांनी केले आहे.