कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे १०वी च्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी १२ वी च्या परीक्षा पुढे ढकण्यात आल्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहिर केलेला. याचपार्श्वभूमीवर आता शिक्षण मंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. १२ वी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरला येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून 8,250 रुपये परीक्षा फी आकारली जाईल.
कोणत्याही विद्यार्थ्याला वेळेअभावी फी न भरल्यामुळे परिक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शिक्षण मंडळाने दिलेल्या निर्णयानुसार 23 एप्रिलपासून परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना अतिविशेष अतिविलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येणार आहे.
कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे १० वी च्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द करता येणार नसल्याने मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीमध्ये एक मताने झालेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षेचा अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान १० वीची परिक्षा रद्द झाली असून विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन कसे केले जाणार व ११वी चा प्रवेश कुठल्या आधारावर केले जाईल या बाबत पालक व विद्यार्थी साशंक असून १० वी परीक्षा संदर्भातील मुद्दा अजूनही शिक्षण मंडळाकडून अस्पष्ट आहे.