मुंबई : सध्या संपूर्ण राज्यभरात कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय सेवा सुद्धा अपुऱ्या पडून लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मदतीचे आव्हान तमाम उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना केले होते. त्यातच आता अभिनेता अजय देवगण याने सुद्धा कोरोनाच्या लढाईत आपला हातभार लावला आहे.
अजय देवगनने शिवाजी पार्कमध्ये आयसीयूची सुविधा असलेले २० बेडची व्यवस्था केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय देवगनने मुंबई महानगर पालिकेला १ कोटी रुपयांची रक्कम दिली आहे ज्यातून २० बेड असलेले इमरजेंसी हॉस्पीटल तयार केले जाईल. दरम्यान याआधी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नानेही १०० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स मागवले आहेत. तर दुसरीकडे सलमान खानने स्वंयपाक घरातून जेवण बनवून फ्रंटलाइन वर्कर्सला वाटप केले होती.
तसेच आयुष्मान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांनी मुख्यमंत्री सहाय्यताला आर्थिक मदत केली. यासह शिल्पा शेट्टी, भूमी पेडनेकर, सु्ष्मिता सेन, कॅटरिना कैफ, विक्की कौशल या सारख्या अभिनेत्यांनीही कोरोना योद्धांना मदत केली होती. आज कोरोनाच्या वाढत्या संकटाशी सामना करण्यासाठी सढळ हाताने मदतीचे आव्हान सर्व कलाकारांनी आपल्या चाहत्यांना केले आहे.