ठाणे – एकीकडे राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत आहे. तर दुसरीकडे भिंवडीत सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याचे दृष्य समोर आलं आहे. ठाणे भिंवडीत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने शहरात मनपा व पोलीस प्रशासनाकडून कडत निर्बध लागू केले आहेत. नागरिकांना गर्दी करू नये असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून पैसे काढण्यासाठी नागरिकांनी बँके समोर मोठी गर्दी केल्याचे चित्र शहरातील जकात नाका परिसरात असलेल्या एसबीआय बँक समोर सकाळ पासून पाहायला मिळत आहे.
सरकारकडून कडक निर्बंध लावण्यात आले असले तरी बँकांच्या बाहेर पैसे काढण्यासाठी गर्दी करण्यात आली , मुख्य म्हणजे बँक प्रशासनाकडून या गर्दीचे कोणतेही नियम किंवा योजना आखण्यात आली नसल्याचे समोर येत आहे. व बँकेच्या बाहेर रोज गर्दी असल्याचे समोर आले आहे . बँक कर्मचाऱ्यांकडून कामात टंगळमंगळ होत असते व कायम बँकेचे सर्व्हर डाउन असते त्यामुळे बँकेच्या बाहेर नागरिक तासंतास उन्हातान्हात उभे असतात. त्यामुळे बँक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना काळात नागरिकांकडू सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाला आहे.