कोल्हापूर : केंद्राने पारित केलेल्या काळ्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक झालेला पाहायला मिळत असताना दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दरवाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांबरोबर सर्व सामान्य लोकांचे कंबरडे मोडले होते. या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आता कँग्रेसनें पाठिंबा दर्शवला आहे.
शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या या बंदमध्ये सहभागी होत काँग्रेस पक्षाचे नेते राज्यभर उपोषण करणार आहेत. लोकशाहीला पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर लादलेले कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात राज्यव्यापी उपोषण सुरु झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेसतर्फेही उपोषण करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हाध्यक्ष सतेज (बंटी) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी, पक्ष निरीक्षक मा.आ. शिरीष चौधरीजी, आ.जयंत आसगावकर, गुलाबराव घोरपडे, काँगेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, ऍड. सुरेश कुऱ्हाडे, दिलीप पाटील, तौफिक मुल्लाणी, सचिन चव्हाण, संजय मोहिते, बाळासाहेब सरनाईक, संध्या घोटणे, सुलोचना नायकवडे, चंदा बेलेकर, करवीर पंचायत समिती सभापती मीनाक्षी पाटील, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, अर्जुन माने यांच्यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.