कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. केवळ आठ दिवस पुरेल इतका रक्तसाठा कोल्हापूरच्या रक्तपेढीत शिल्लक आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासह जिल्ह्यात सामाजिक संस्थेत केवळ १६०० रक्त पिशव्या शिल्लक आहे.
सध्या कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे. दिवसभरात जवळपास १५ हजार जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. लसीकरणानंतर संबंधित नागरिकांना दोन महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे त्याचा थेट परिणाम आहे, तो रक्तसाठ्यावर झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात संभाव्य गरज लक्षात घेऊन रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.