नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका ही देशात आदर्शवत महापालिका म्हणून ओळखली जाते.साफसफाई, रस्ते,पाणीपुरवठा,मलनिस्सारण आदी बाबतीत इतर शहरातील लोक सुद्धा कौतुकाने या महापालिकेकडे पाहत असतात.
कोरोना काळात सुद्धा महापालिकेने अत्यन्त जबाबदारीने आपले कर्तव्य निभावले आहे.आता ही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविड सेंटर,ऑक्सिजन,बेड,व्हँटेलेटर कमी पडू नयेत म्हणून आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे.
दुसऱ्या बाजूने लसीकरण मोहीम ही चालू आहे .महानगरपालिका क्षेत्रातील १.५ लाखाहून अधिक नागरिकांचे कोव्हीड लसीकरण पूर्ण झालेले असताना आज सेक्टर ५ वाशी येथील ईएसआयएस रूग्णालयामधील जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये लक्ष्मी अय्यर या ९९ वर्षांच्या आजींनी अत्यंत उत्साहाने लस घेतली.
महापालिका अत्यन्त काळजीपूर्वक काम करत असून जनतेचा विश्वास वाढत आहे.त्यामुळे लसीकरण करून घेण्यात नागरिक स्वयंस्फूर्तीने पुढे येताना दिसत आहेत.एकंदर दोन्ही आघाड्यावर नवी मुंबई महापालिका लढताना दिसून येत असून त्यामुळे जनतेत विश्वासाचे वातावरण तयार होत आहे.