बारामती (पुणे) दि.१५ – अनेक गुन्हे असे असतात की त्यावर आपण खूप गांभीर्याने विचार करतो.मात्र, काही गुन्हे असे असतात त्यावर हसावं की रडावं हेच समजत नाही.असाच एक प्रकार बारामतीमध्ये घडला असून, ही चोरी प्रेमातून झाली असल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. तंदीत असलेल्या प्रियकराला आर्थिक चणचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रियसीने स्वतःच्या घरावर दरोडा टाकून घेतला.
हा प्रकार बारामती पोलिसांनी उघडकिस आणला आहे. या प्रकरणात प्रियकराला मुद्देमालासह बारामती पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये ३ लाख १९ हजारांची रोख रक्कम व ९३ हजारांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. कसबा परिसरात दोन चोरटयांनी एका घरात घुसून सासू सुनेला चाकूचा धाक दाखवून घरातील आठ लाखांचा ऐवज लुटून नेला.
सासू सुनेचा आरडा ओरडा पोलीस ठाण्यात पोहचला. व पोलीसांचा तपास सुरु केला. पोलिसांच्या उलट सुलट प्रश्नांना सून घाबरली आणि प्रियकराला आर्थिक चणचणीतून बाहेर काढण्यासाठी केलेला कट स्वतःहून कबूल केला.