पालघर। पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात ब्राह्मण गाव येथील एका घर आणि दुकानाला लागलेल्या आगीमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय.
मौळे असं या कुटुंबाचे नाव असून मालकीच्या घराला आणि दुकानाला २९ मार्च रोजी रात्री अडीचच्या सुमार आग लागली. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचा धूर आल्याने व आगीचा झोत मोठा असल्याने गावातील लोक समजताच धावून आले, मात्र खूप उशीर झाला होता. मरण पावलेल्यांमध्ये अनंता मौळे यांची आई गंगुबाई मौळे, पत्नी द्वारका मौळे, १५ वर्षांची मुलगी पल्लवी मौळे आणि दहा वर्षांचा मुलगा कृष्णा मौळे यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अनंता मौळे आणि त्यांची दोन मुलं वाचली आहेत. १२ वर्षीय भावेश आणि १७ वर्षीय अश्विनी यांच्यावर नाशिकमधील दवाखान्यामध्ये उपचार सुरु आहेत.