देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. गेल्या २४ तासात देशात तब्बल ८१ हजार ४४६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २३ लाखांवर पोहोचली आहे. गेल्या सहा महिन्यातील एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. याआधी ११ ऑक्टोबरला ७४ हजार ३८३ रुग्णांची नोंद झाली होती. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
India reports 81,466 new #COVID19 cases, 50,356 discharges, and 469 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry.
Total cases: 1,23,03,131
Total recoveries: 1,15,25,039
Active cases: 6,14,696
Death toll: 1,63,396Total vaccination: 6,87,89,138 pic.twitter.com/QkmQxfpsNB
— ANI (@ANI) April 2, 2021
गेल्या २४ तासात ५० हजार ३५६ जण उपचारानंतर बरे झाले असून ४६९ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनाबाधितांची संख्या १ कोटी २३ लाख ३ हजार १३१ इतकी झाली आहे. तर १ कोटी १५ लाख २५ हजार ३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि मध्य प्रदेशात सलग करोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. करोना रुग्णवाढीत महाराष्ट्र आघाडीवर असून लवकरच ठाकरे सरकाकडून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे.