नवी दिल्ली – हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या शाही स्नानात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हरिद्वार येथे दरवर्षी शाही कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते मात्र यावर्षी कुंभमेळ्यावर कोरोनाचे सावट असल्याने कोरोना नियमांचे पालन करून कुंभमेळ्याला परवानगी देण्यात आली होती. आज दुसरे शाही स्नान होत आहे. या शाही स्नानासाठी अनेक अखाड्यांतील साधू-संत आले आहेत.यावेळी कोरोना नियमांच्या पार चिंधड्या उडाल्याचे पाहायला मिळाले. येथे ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत आहे, ना कुणी मास्क लावताना दिसत आहे.
कुंभ मेळ्याचे आयजी संजय गुंज्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाही स्नानासाठी सर्वात पहिले अखाड्यांना परवानगी देण्यात आली. यानंतर ७ वाजल्यापासून सामान्य जनतेला स्नानाची परवानगी देण्यात आली. अनेक साधूही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. असं असतानाही उत्तराखंड पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही.
#WATCH | Sadhus of Juna Akhara take second 'shahi snan' at Har ki Pauri ghat in Haridwar, Uttarakhand pic.twitter.com/ALqFQHH2nO
— ANI (@ANI) April 12, 2021
इंडिया टुडेच्या माहितीनुसार, सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. ५० हजार लोकांची टेस्ट करण्यात येत आहे. अनेक साधू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आणखीही टेस्ट करण्यात येत आहे. हे सर्व आव्हानात्मक आहे. मात्र, लोकांनी नियमांचे पाल करावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.