फुलंब्री :फुलंब्री तालुक्यातील धानोरा येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार रोजी करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, गणेश उकिर्डे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चंद्रकांत जाधव, शामराव साळुंके व आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
धानोरा येथे मंगळवार पासून टेनिस बॉल क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली आहेत. या सामन्यासाठी विविध पारितोषिके ठेवण्यात आले आहेत. यात प्रथम पारितोषिक जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्या वतीने 31000 रुपये , द्वितीय पारितोषिक राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश पाटील उकिर्डे यांच्या वतीने 2100 रुपये, तर तृतीय पारितोषिक शामराव साळुंके यांच्या वतीने 11000 रूपये ठेवण्यात आले आहे.
या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश उकिर्डे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत जाधव, सरपंच शामराव साळुंके, बोरगाव अर्ज गावचे सरपंच शिवाजी खरात, टाकळी कोलते चे सरपंच संजय काकडे, सरपंच अमोल डकले, रामदास काकडे, कैलास पवार, सतीश बलांडे, प्रविण एखंडे,संदीप बलांडे व आदींची उपस्थिती होती.