वाढती कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता दिवसेंदिवस दिवस आरोग्य प्रशासनापुढे आव्हाने समोर येत आहेत. यात भरीला भर म्हणजे कोरोनाची लागण झालेल्या काही रुग्णांमध्ये लक्षणे आढळून येत नसल्याने कोरोनाचा धोका वाढतोय. संबंधित व्यक्ती ही कोरोनाबाधित असली तरीही ती आढळून येत नाही व त्यामुळे कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अजूनच घट्ट होत आहे.
कोरोनाचा वाढता धोका पाहता बाधित व्यक्ती विगलीकरणात राहणे महत्वाचे असते. परंतु कोरोनाची बाधा होऊनही सर्दी, खोकला, ताप यांसारखी लक्षणे आढळून न येणाऱ्या रुग्णांना असिम्प्टोमॅटीक असे म्हणतात.
पुणे आरोग्य विभागाचे आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार लक्षणे न आढळणाऱ्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तसेच यांच्यापासून कोरोना संक्रमण कसे रोखता येईल याचे नियोजन करणे महत्वाचे आहे.
कोरोनावर नियंत्रण कसे ठेवावे,तसेच कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तातडीने कोविड चाचणी करून घ्यावी.सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे व पुरेशी काळजी घेणे महत्वाचे आहे.बाहेरून आल्यावर शरीर स्वच्छ ठेवणे तसेच सॅनिटायझर सोबत असणे महत्त्वाचे आहे.
आरोग्यविषयक समस्या असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.तसेच प्रतिकारशक्ती वाढणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.