दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या विळख्यामुळे देशातील रुग्णसंख्या वाढत जात असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. वाऱ्यासारखा पसरत जाणाऱ्या या संक्रमणाला वेळीच रोखण्यासाठी देशात पुन्हा कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात यावा असे अमेरिका प्रशासन मुख्य आरोग्य सल्लागार डॉ.अंथनी एस फौसी यांनी सांगितले. डॉ.अंथनी एस फौसी हे अमेरिकेतील नामवंत डॉक्टर असून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत त्यांनी काम केले आहे.
वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून ऑक्सिजनचा होणारा तुटवडा बेड्स उपलब्ध न होणे या सारख्या असंख्य समस्येने उपचारादरम्यान मृत्युचे प्रमाण वाढते आहे.इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीनुसार डॉ.अंथनी यांच्या मते भारत हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोना हॉटस्पॉट बनत आहे.यावर उपाय म्हणजे कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे आहे.त्यासाठी देशात कडकडीत लॉकडाऊन सक्तीचे करणे व लसीकरणाचा पुरवठा वाढवणे हे आवश्यक आहे.
कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे केल्याने कोरोनावर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल. सद्यस्थितीत भारतात कोरोनाने मृत्यूचे थैमान घातले आहे.दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत दिवसेंदिवस परिस्थिती भयावह होत आहे.