अमेरिकेतील अटलांटामध्य़े तीन वेगवेगळ्या मसाज पार्लरवर झालेल्या अंधाधुंदी गोळीबारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या गोळीबारात एक जण गंभीर जखमी आहे.
यामध्ये ज्या दोन स्पामध्ये गोळीबार झाला ते एकमेकांसमोर आहेत तर तिसरा स्पा हा चेरोकी काऊंटीमध्ये आहे. या गोळीबाराचा नेमका हेतू काय आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.
चेरोकी काऊंटीच्या गोळीबारातील संशयिताला अटलांटामधील दक्षिणेच्या क्रिस्प काऊंटीमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
सायंकाळी ५.५० वाजता मसाज पार्लरमध्ये चोरी झाली. यावेळी झालेल्या गोळीबारात तीन महिलांचा मृत्यू झाल्याचं अॅटलांटा पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस पाहणी करत असतानाच आणखी एका पार्लरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती फोनवरून कळाली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मसाज पार्लरमध्ये झालेल्या गोळीबारात चार महिला मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.