कोल्हापूर – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करण्यापेक्षा केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लस आणण्यासाठी सहकार्य करावे असा सल्ला राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चांगले काम बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. एका बाजूला मुख्यमंत्री जनतेचा जीव कशाप्रकारे वाचला जावा या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. मात्र,भाजप त्यावर टीका करत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात घेऊन जावे आणि महाराष्ट्राला जास्तीत जास्त वॅक्सिंन कसे देता येईल याचा प्रयत्न त्यांनी करायला हवा असे देखील पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले आहेत.
सध्या राज्यात कोरोनाने हैदोस घातला असताना राज्यातील विरोधी पक्षाने राज्य सरकारला सहकार्य करावे,असे आवाहनही सतेज पाटील यांनी यावेळी केले आहे.