उत्तरप्रदेश : स्वर भासकर नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे आणि ट्विटमुळे चर्चेत असते तसेच केंद्र सरकारवर टीका करण्याची एकही संधी स्वरा सोडत नाही. मात्र आता तिने केलेल्या या कामगिरीबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. तिनं कचरापेटीमध्ये सापडलेल्या एका मुलीचे पालकत्त्व स्वीकारले आहे. या मुलीसोबतचे तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्तानं स्वरा उत्तर प्रदेशमध्ये गेली होती. त्यावेळी स्वराने तेथील एका अनाथ आश्रमाला भेट दिली. खरं तर तेथील मुलांना मदत करण्याच्या उद्देशानं ती तेथे गेली होती. परंतु या ठिकाणी तिचं लक्ष एका गोंडस मुलीने वेधून घेतले होते. तसेच ती तिच्या प्रेमातच पडली होती. या मुलीची कथा ऐकून स्वरा अत्यंत भावूक झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कारण ही मुलगी त्या अनाथआश्रमाच्या संचालिका प्रियांका जौहरी यांना एका कचऱ्याच्या डब्यात सापडली होती.
पुढे स्वराने या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुलगी पुढील काही काळ अनाथआश्रमात राहील परंतु तिचा संपूर्ण आर्थिक खर्च स्वरा भास्कर उचलणार आहे. अगदी तिच्या पालनपोषणापासून शिक्षणापर्यंत. ज्या वेळी ही मुलगी थोडी मोठी होईल त्यावेळी स्वरा तिला आपल्या घरी घेऊन जाईल अशी माहिती पुढे आली आहे.