मुंबई – कोरोनाने संपूर्ण राज्यासह जगात हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. लोकांच्या मृत्यूत वाढ होतेय मात्र याच जरासही भय उरल नसल्याचं चित्र सकाळी मुंबईतील दादरच्या भाजी मार्केट मध्ये निदर्शनास आले आहे. सरकारकडून कडक निर्बंध लावण्यात आले असले तरी नागरिक त्यांच पालन करत नसल्याचं त्या गर्दीतून समोर आलं आहे.
यंदा सर्वच सणांवरती कोरोनाच सावट आहे त्यामुळे राज्य सरकारकडून यावर्षीची गुडी हि घरोघरी उभारावी व सर्वानी गुडीपाढवा सण घरीच साजरा करावा यासाठी नियमावली जाहीर करून सूचना देण्यात आल्या मात्र मुंबईत दादर फुल मार्केटमध्ये सकाळी तोबा गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. सोमवारीही अशीच गर्दी या परिसरात झाली होती. दादरच्या भाजी आणि फुल मार्केटमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या संख्येनं नागरिक बाजारात एकत्र जमा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.
या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडालेला पाहायला मिळाला. त्यामळे जर अशीच गर्दी जर नागरिक सूचना देऊनही करत असतील तर नागरिकांना कोरोनाच भय आहे का नाही ? हा प्रश्न उपस्थित होतो.