प्रत्येकाच्या आयुष्यात सोशल मीडिया हा सध्याच्या परिस्थितीत खूप महत्त्वाचा भाग बनला आहे. आपले छोटे मोठे कामं आपण इंटरनेटच्या साहाय्याने पार पाडत असतो. त्यामुळे सोशल मीडिया हे लोकांच्या आयुष्यातला महत्त्वाचे स्थान बनले आहे.
त्यात व्हॉट्सॲप हा प्लँटफॉर्म सगळ्यांचा आवडता अँप आहे. सध्या कोणी व्हॉट्सॲप वापरत नसेल तर ते नवलचं. एकमेकांना कोणत्या गोष्टी पोहोचण्यापासून चॅटिंगचा उत्तम असा पर्याय आहे. मात्र, फेसबुकप्रमाणे व्हॉट्सॲपवरही चोरून लपून प्रोफाईल पाहणाऱ्यांची कमी नाही. त्यामुळे अनेकदा प्रश्न पडतो आपली प्रोफाईल कोणी पाहिला असेल किंवा कोणता व्यक्ती प्रोफाईल नेहमी स्टॉक करीत असेल. आज आपण तुमचा प्रोफाईल कोणी पाहिली हे आपण कसे तपासाचे हे पाहणार आहोत.
आपल्या मोबाईल मध्ये काही खाजगी तर काही ऑफिसच्या कामांकरिता अनेक नंबर असतात. त्यात अनेक नंबर हे अनोळखी असतात ह्या सर्वांमध्ये उपस्थित होतो तो आपल्या सुरक्षिततेचा प्रश्न?
काही लोक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अभिनेता, अभिनेत्री किंवा दुसरे कोणते फोटो ठेवत असतात. तर काही लोक याचा विचार न करता स्वतःचा किंवा आपल्या मुलांचा फोटो ठेवतात.
मात्र कोणी तुमच्या व्हॉट्सअॅपवर लक्ष ठेवून आहे का? आणि असेल तर ते कसे ओळखायचे.
या अँपचा वापर करा
तुमचा डिस्प्ले पिक्चर (डीपी) कोण पहात आहे हे तपासण्यासाठी सर्वप्रथम तृतीय पक्षाचे अॅप डाउनलोड करावे लागेल. यासाठी Play Store वर जाऊन व्हॉट्सॲप-हू व्ह्यू मी किंवा व्हॉट्स ट्रॅकर अॅप (WhatsApp- Who Viewed Me या Whats Tracker) डाउनलोड करावे लागेल. तसेच एक मोबाइल बाजारपेठ ॲप डाउनलोड करावे लागेल. ते डाउनलोड केल्याशिवाय हू व्ह्यू मी ॲप डाउनलोड होणार नाही. व्हॉट्सॲप-हू व्ह्यू मी ॲप डाऊनलोड झाल्यानंतर तुम्ही तुमचा व्हॉट्सअॅप प्रोफाईल फोटो पाहणारे कोण? हे तपासू शकता. मात्र, तुम्हाला मागील चोवीस तासांत तुमचा व्हॉट्सअॅप डीपी पाहणाऱ्यांची यादी मिळेल.