उन्हाळा म्हटलं की अनेकजणांना अनेक त्रास जाणवू लागतात मात्र गोष्टी खाल्यास आपले जीवन उन्हाळ्यातही तंदुरुस्त राहते. उन्हाळ्यात त्रास टाळण्यासाठी कोणत्या वस्तू, पदार्थ, फळे खावीत?
फळे- उन्हाळ्यात द्राक्षे, खरबूज, टरबूज, आंबा ही फळे येतात. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या रसदार फळांचे सेवन गरजेचे ठरते.
भाज्या- भाज्यांमध्ये पांढरे कांदे, पालेभाज्या, टोमॅटो, काकडी, भाज्यांचा ज्यूस, आवळा, कोबी, मशरूम, भेंडी, पडवळ, बीट, रताळी, गाजर, तांदुळजा, सुरण इत्यादी प्रकार असावेत. जेवणात वेगवेगळ्या प्रकारचे रायते, फळांचे शेक्स, सूप्स, नाचणीचे आंबिल, दही-भात असे प्रकार घ्यावेत.
फलाहार – वेलची केळे, गोड मोसंबी, सफरचंड, डाळींब, पेर ही फळे सर्वाना चालतील. कफाचा सहसा त्रास होत नसेल त्यांना हिरव्या सालीचे केळे, गोडे संत्र, कलिंगड, पेरू ही फळे चालतील. नाश्ता आणि जेवण यांच्या मधल्या काळात फळे खावीत. चवीला आंबट असणारी फळे – द्राक्ष, अननस, सीताफळ- उन्हाळ्याच्या सुरुवातीला टाळावीत.
पाणी – प्रत्येक जेवणात मधे मधे थोडे पाणी प्यावे. जेवणानंतर एकदम पाणी पिऊ नये. जेवताना फ्रीजच्या पाण्याचा वापर तर कटाक्षाने टाळावा. माठातील पाणी चालेल. पाण्यात वाळ्याची पुरचुंडी टाकून पाणी प्यावे. एसीमध्ये आठ-दहा तास काम करताना तहान लागत नाही. तरी या ऋतूत लक्षात ठेवून दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी अवश्य प्यावे. जितके थंड पाणी प्याल, तेवढीच तहान आणखी वाढत जाते, तहान वाढून जितके जास्त पाणी प्याल, त्याने भूक मंदावत जाते. धने-जीरे-खडीसाखर घालून उकळवून थंड केलेले किंवा आले किंवा सुंठ-साखर घालून उकळवून थंड केलेले पाणी प्यावे.