राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील काही दिवसांत त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली होती. तसेच त्यांची तब्येत सध्या व्यवस्थित आहे अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे.
दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल एका कार्यकर्त्याने व्यक्त केलेल्या भावना शेअर केल्या आहेत. शरद पवार होणं म्हणजे हे कुणाचंही काम नाही, अशा भावना एका कार्यकर्त्याने व्यक्त केल्या आहेत. रोहित पवारांनी ट्विट करून शेअर केल्या आहेत.
‘या पायाच्या प्रत्येक रेषेला लागलेली आहे महाराष्ट्राच्या अक्षांश रेखांशावरील माती, किल्लारीचा भूकंप असो की कोल्हापुरचा महापूर.. संकटांच्या मानगुटीवर उभं राहून दिलासा द्यायला हेच पाय धावले, याच पायांना दररोज झाल्या कितीही जखमा, खांद्यावर आलं कितीही ओझं, तरी त्यांनी कधी केली नाही तक्रार, किती आले किती गेले, पण सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे अशा शब्दात कार्यकर्त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आदरणीय @PawarSpeaks साहेबांविषयी एका कार्यकर्त्याने व्यक्त केलेल्या आपल्या भावना मला 'व्हाट्स अप'वर आल्या. त्या मी तुमच्यासाठी इथं शेअर करतोय.
जरूर वाचा! pic.twitter.com/fhtj13VeL3— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 1, 2021