जनसंवाद अभियान कार्यक्रम गावागावात राबवणार -पालघर पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील.

वाढवन :-पालघर जिल्हा डहाणू तालुक्यातील वाढवन टीघरेपाडा गणेशोत्सव मंडळाने 68 व्या कार्यक्रमात “एक गाव एक गणपती” या उपक्रमाअंतर्गत प्रमुख पाहुणे म्हणून पालघर पोलीस अधीक्षक (sp)आयपीएस अधिकारी श्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.मंडळाचे सचिव कु.सागर कडू यांच्या प्रयत्नाने व त्यांची टीम सहसचीव् कु.तेजस पाटील, सहसचिव कु.वैभवी पाटील, सदस्य क्रिंजल(सई) पाटील,कु.स्वप्नील पाटील,कु.निलज् पाटील यांच्या आमंत्रित केलेल्या विनंतीस मान देऊन उपस्थित होते.
यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना श्री पाटील म्हणाले,पालघर जिल्ह्यातील चार मंडळांना पोलिसांमार्फत बक्षिसे दिली जाणार आहेत.तसेच जनतेच्या सर्वसामान्य अडचणी दूर व्हाव्यात म्हणून जनसंवाद अभियानाचे कार्यक्रम गावागावात ‘एक गाव एक पोलीस’ म्हणून वाढवन गावात psi मा.श्री.अल्पेश विशे साहेब यांना कार्यरत केले आहे. वाईट चालीरीती म्हणजेच नशाबंदी ,बालविवाह,सोशलमीडियातून होणाऱ्या अफ़वा,तसेच बेरोजगारीतून निर्माण होणारी गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी पोलीस आणि सामान्य जनता यामधील सुसंवाद राखून गुन्हेगारी कमी होऊन भविष्यात होणाऱ्या तरुणांवरील केसेस कमी व्हाव्यात आणि त्यांचे भविष्य चांगले जावे यासाठी “जनसंवाद कार्यक्रम” राबविण्यात आले आणि येत आहेत.
तसेच पोलिसांकडून रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करून 1850 तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. तरुणांना एमपीएससी,यूपीएससी चे खूप चांगले मार्गदर्शन करून पोलीस अधीक्षकांनी प्रेरणा दिली.
सदर ह्या कार्यक्रमास आमंत्रित केलेल्या मंडळाचे सचिव कु.सागर कडू व त्यांच्या टीमचे त्यांनी आभार मानले .तसेच आमंत्रित केलेल्या सर्व युवा मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी सदस्य यांची प्रशंसा करून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
वाढवन बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री नारायण पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून मंडळाचे अध्यक्ष कु.निलेश राऊत आणि मंडळाचे सचिव सागर कडू यांनाही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमास बोईसर उपविभागीय अधिकारी आयपीएस अधिकारी श्री नित्यांदाच्या साहेब,वाणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप कहाळे साहेब,चिंचणी पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री अल्पेश विशेष साहेब ,वाढवन संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री नारायण पाटील , जिल्हा परिषद माजी शिक्षक तसेच चिंचणी गटाचे केंद्र प्रमुख श्री .संदीप म्हात्रे सर त्यांच्या पत्नी सौ.रेश्मा म्हात्रे मॅडम,जिल्हा परिषद चे सध्या स्थित असलेले श्री.सावे सर,12 गाव भंडारी समाजाचे सहसचिव श्री.अशोक पाटील,वाढवन उपसरपंच श्री.हरेश्वर पाटील, जेष्ठ समाजिक कार्यकर्ते श्री.वसंत पाटील,श्री.सुरेश पाटील,श्री.प्रदीप पाटील इत्यादी उपस्थित होते.
पालघर पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब आणी ips ऑफिसर मा.श्री नित्यानद झा साहेब यांच्या हस्ते पदवीधारक प्राप्त विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि वृक्ष रोपवाटिका तसेच सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये जास्त विद्यार्थिनी असून त्याबद्दल समाधान व्यक्त केले.त्यावेळी डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी मातेचे मंदिर बोरसे येथे सूर्या नदीत बुडणाऱ्या तिघांना ज्यांनी जीवाची परवा न करता नदीत उडी मारून प्राण वाचविणाऱ्या तीन तरुणांना कु.प्रशांत पाटील,कु.हितेश पाटील,कु.वैभव पाटील यांचा ही सत्कार करण्यात आला.राष्ट्रीय गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या कु.प्राची दिलीप राऊत तर मुंबई क्रिकेट असोशियन मार्फत निवड होऊन मुंबई विरुद्ध बांगलादेश संघाबरोबर खेळलेल्या अवघ्या 13 वर्षाच्या कु.हर्ष राकेश पाटील याचाही सत्कार करण्यात आला.
पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांचे सुपुत्र रूद्रांश पाटील याने रायफल शूटिंग या खेळात भारतासाठीचे एशीयन गेम मधील पहिले गोल्ड मेडल जिंकले,या यशासाठी मंडळाचे सचिव सागर कडू यांनी अभिनंदन केले.